महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून 67 लाख रुपयांची दारू जप्त - Alcohol seized in mumbai

राज्यातून तस्करीच्या माध्यमातून आणलेली दारू जप्त करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान तब्बल 67 लाख 57 हजार 740 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

Mumbai crime news
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेली दारू

By

Published : May 26, 2021, 6:49 PM IST

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये अवैधरित्या गोवा राज्यातून तस्करीच्या माध्यमातून आणलेली दारू जप्त करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान तब्बल 67 लाख 57 हजार 740 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी होत असल्यामुळे मद्यविक्रीवर निर्बंध आल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातून तस्करी करण्यात आलेली दारू राज्यात विकली जात असून यामुळे राज्य शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.

साफळा रचूूून कारवाई
राज्याच्या उत्पादन महसूल विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. यादरम्यान एक ट्रक उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या नजरेस आल्यानंतर त्यास अडवून त्याची तपासणी करण्यात आली असता या ट्रकमध्ये विविध ब्रँडचे 750 एमएलचे 525 बॉक्स मिळून आले. याबरोबरच बियर टिनचे 100 बॉक्स असे एकूण 625 बॉक्स उत्पादन शुल्क खात्याने जप्त केले आहेत.

तिसरी मोठी कारवाई
गेल्या काही दिवसात ही तिसरी मोठी कारवाई आहे. मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातून मुंबई विक्रीसाठी आणण्यात आले होते. या अगोदरही गोवा राज्यातून अवैधरित्या तब्बल 56 लाख 50 हजार 500 रुपयांचे मद्य उत्पादन शुल्क खात्याने 19 मे रोजी जप्त केले असून 20 मे रोजी राज्यातील उस्मानाबाद येथे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 43 लाख 93 हजार रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतरची ही तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details