मुंबई -गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कालवधीपासून गरीब, कष्टकरी, खासगी नोकरदार वर्गाचा रेल्वे प्रवास बंद आहे. त्यामुळे कर्जत, कसारा, पनवेल व विरारवरुन येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. लोकल सेवा सरसकट सर्वासाठी चालू करावी, अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ रोजी रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करू -
एप्रिल 2021 पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुरूवातीला छुप्या पद्धतीचा वापर काही प्रवाशांकडून केला जात होता. मात्र, ओळखपत्र तपासणीला आणि तिकिट तपासणीला वेग आल्याने लोकलमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना, विविध पक्षांद्वारे लोकल सुरू करण्यासाठी आंदोलने सुरू केली. मात्र, शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलिसांकडून नोटीस पाठविली जात आहे. जर, प्रवाशांनी आंदोलन केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असा इशारा नोटीसमधून दिला जातोय. मात्र, आम्ही आता शांत बसणार नाही. सरकारने तात्काळ लोकल संबंधित निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, असा इशारा आता अनेक प्रवासी संघटनांकडून दिला जात आहे.
प्रवाशांचे प्रचंड हाल -
लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा.. अन्यथा 15 ऑगस्टला धडक मोर्चा, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा इशारा - मुंबई लोकल सेवा
लोकल सेवा सरसकट सर्वासाठी चालू करावी, अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ रोजी रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहे.
Start local service
वसई-विरार, कल्याण-कसारा-कर्जत, पनवेल या ठिकाणांहून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागतेय. त्यामुळे लोकल सेवा सरसकट सुरू करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे सर्व पालन करून प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला जाणार आहे, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.