अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशनच्या करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ - animal care foundation
मुंबईतील कळंबोली येथे प्राण्यांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवी मुंबईतील कळंबोली येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. ही संस्था अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन, पीपल फॉर अॅनिमल आणि टाटा ट्रस्ट यांनी संयुक्तपणे स्थापन केली आहे. मागील वर्षी २६ डिसेंबरला निमल केअर सेंटर फाऊंडेशन, पीपल फॉर अॅनिमल्स, आणि सिडको यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता. या त्रिपक्षीय करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान घेण्यात आला.
मुंबई- मागील वर्षी २६ डिसेंबरला अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन, पीपल फॉर अॅनिमल्स, आणि सिडको यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता. या त्रिपक्षीय करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान घेण्यात आला.
अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन ही संस्था, पीपल फॉर अॅनिमल आणि टाटा ट्रस्ट यांनी संयुक्तपणे स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे प्राण्यांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवी मुंबईतील कळंबोली येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. या हॉस्पिटलमधील 50 टक्के सुविधा ही दारिद्र्यरेषेखालील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अल्प उत्पन्नधारक घटकांच्या मालकीचे प्राणी तसेच भटक्या आणि अपघातग्रस्त जनावरांना मोफत दिली जाणार आहे. यासाठी 26 डिसेंबर 2018 रोजी अॅनिमल केअर सेंटर फाऊंडेशन मुंबई, मे. पीपल फॉर अॅनिमल्स नवी दिल्ली आणि सिडको यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला होता. या करारनाम्याच्या दस्तावरील देय असलेले 31 लाख 99 हजार 750 रुपये इतके मुद्रांक शुल्क त्यावरील दंडासह लोकहितार्थ माफ करण्यास मंजुरी देण्यात आली.