महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटीच्या ४८ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची ऑर्डर.. परेल डेपोत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आर्थिक कोंडीमुळे कर्मचारी संतप्त असताना त्यातच ४८ कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीची ऑर्डर काढल्याने कर्मचाऱ्यांनी परेल डेपोमध्ये कामबंद आंदोलन केले आहे.

parel strike
परेल डेपोत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By

Published : Sep 25, 2020, 5:26 PM IST

Updated : Sep 25, 2020, 7:20 PM IST

मुंबई - गेले चार महिने वेतन रखडल्याने एसटी कामगार संतप्त झाले आहेत, त्यातच 48 कामगारांची सेवा समाप्तीची ऑर्डर काढल्याने परेल डेपोत कर्मचारी आणि चालक-वाहकांनी काम बंद आंदोलन केले आहे.

परेल डेपोत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी अहोरात्र काम करत सेवा पुरवत आहेत, मात्र गेले तीन महिने त्यांचा पगारच त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाला पगार देण्यासाठी विनंती केली असता, काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे 48 कामगारांना सेवा समाप्तीची ऑर्डर काढल्याने महामंडळ प्रशासनाविरुद्ध कर्मचारी संतप्त झाले आहेत. यामुळे परेल डेपो मधील एसटी कर्मचारी व वाहक, चालक यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कर्मचाऱ्यांना अनेक समस्या आहेत, त्यांना सरकारला काहीतरी सांगायचे आहे. याबाद्दल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आहे. ईटीव्ही भारत प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..

परेल डेपोत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Last Updated : Sep 25, 2020, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details