महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Workers Allowance Issue : एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित भत्ते तत्काळ द्या; कामगार सेनेची मागणी - एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब

महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न १७ ते १८ कोटी पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे वाहतुक उत्पन्नाचे नियोजन करतांना कोविड प्रोत्साहन भत्ता, प्रलंबित कोविडची वैद्यकिय बिले, ईतर वैद्यकिय बिले अदा करण्याचे नियोजन करावे तसेच प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा फरक या देणी एकाच वेळी देणे शक्य होत नसेल. तर अशा प्रसंगी त्याचे जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतनापासुन समान हप्त्यात वाटप करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 19, 2022, 9:12 PM IST

मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या एकतर्फी वेतनवाढीच्या फरकाच्या रक्कमेचा हप्ता जुन २०२२ पासून संपुष्टात येत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार जवळपास पाच ते सहा हजार रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कर्मचाऱ्यांचे महामंडळाकडे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा फरक प्रलंबित आहे.

परिवहन मंत्र्यांकडे मागणी: संपानंतर एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न १७ ते १८ कोटी पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे वाहतुक उत्पन्नाचे नियोजन करतांना कोविड प्रोत्साहन भत्ता, प्रलंबित कोविडची वैद्यकिय बिले, ईतर वैद्यकिय बिले अदा करण्याचे नियोजन करावे तसेच प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा फरक या देणी एकाच वेळी देणे शक्य होत नसेल. तर अशा प्रसंगी त्याचे जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतनापासुन समान हप्त्यात वाटप करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहेत.


'कोविड प्रोत्साहन भत्ता तत्काळ द्या' :एवढी कर्मचाऱ्याची देणी महामंडळाकडे प्रलंबित आहे. तसेच कोविड प्रोत्साहन भत्ता काही विभागात देण्यात आला तर काही विभागात देण्याबाबत आजपर्यंत कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. कोविड प्रोत्साहन भत्ता ज्या कर्मचाऱ्यांना मिळाला नाही, अशा सर्व कर्मचा-यांना तत्काळ अदा करावा, सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा रजेचा पगार व कराराच्या हप्त्याची थकीत रक्कम त्वरीत देण्यात यावी. सन २०१९ च्या भरतीतल्या प्रशिक्षण पुर्ण झालेल्या उमेदवारांना तत्काळ रा.प. सेवेत समावून घ्यावे, तसेच ज्या उमेदवारांचे वाहन चालन चाचणी व प्रशिक्षण देण्यात आले नाही, अशा उमेदवारांना वाहन चालन चाचणी व प्रशिक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी ही अरविंद सावंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

'या' आहेत मागण्या :

१) जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत २% महागाई भत्त्याचा ३ महिन्याचा ६ % एवढा फरक

२) जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत ३ % महागाई भत्त्याचा ९ महिन्याचा २७ % एवढा फरक

३) जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ५ % महागाई भत्त्याचा २७ महिन्याचा १३५ % एवढा फरक.

४) जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत ११ % महागाई भत्त्याचा ४ महिन्याचा फरक.

५) जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ पर्यंत ३% महागाई भत्त्याचा ४ महिन्याचा १२% एवढा फरक.

५) १ एप्रिल २०१६ पासुन ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६७ महिन्याच्या घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा अनुक्रमे १, १% चा फरक.

हेही वाचा -Minister Aditya Thackeray : '...तर मुंबईत किमान गुडघ्यापर्यंत पाणी साचु शकते'

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details