महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST workers Protest : मानखुर्द येथे ठिय्या मांडून बसलेले कर्मचारी निघाले आझाद मैदानाकडे; दरेकर, खोत सहभागी - प्रविण दरेकर बातमी

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाका परिसरात बसून आहेत. आता मानखुर्द जकात नाका ते आझाद मैदान असा पायी प्रवास ते करणार आहेत.

ST workers agitation
ST workers agitation

By

Published : Nov 10, 2021, 4:30 PM IST

Updated : Nov 10, 2021, 4:42 PM IST

मुंबई -विविध मागण्यांसाठी सध्या राज्यातील एसटी कर्मचारी (ST workers Protest) संपावर गेले आहेत. यासाठीच गेल्या चार तासांपासून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) आणि आमदार सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाका परिसरात बसून आहेत. सरकार जरी चर्चेसाठी तयार असलं तरी जर त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होत असतील तरच आम्ही चर्चा करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासाठी आता मानखुर्द जकात नाका ते आझाद मैदान असा पायी प्रवास ते करणार आहेत.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

एसटी कर्मचारी आक्रमक -

हेही वाचा -ST Workers Strike : पडळकर, किरीट सोमैयांना पोलिसांनी घेतले ताब्यात; मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त

राज्यात काही दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचारी देखील आक्रमक झाले आहेत. आज एकत्रित मंत्रालयावर आंदोलन करण्याच्या तयारीत कर्मचारी आहेत. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

एसटी कर्मचारी आंदोलनाला राजकीय वळण -

यामध्ये आता राजकीय पक्षांनी देखील उडी घेतल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मुलाबाळांसह कर्मचारी मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील, असा इशारा पडळकरांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचारी मुंबईत जमायला सुरुवात झाली आहे व यांना अडवण्यासाठी जागोजागी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबतच मानखुर्द जकात नाक्‍यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. सदाभाऊ खोत प्रविण दरेकर यांनी मानखुर्द जकात नाक्यावरच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा -ST Workers Strike : परिवहन मंत्र्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार रवी राणांची मागणी

Last Updated : Nov 10, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details