ST Worker suspention : आज १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ९२६ वर - suspended employees dismissed
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. महामंडळाने आज १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९२६ वर पोहोचली आहे. महामंडळाने आतापर्यत ३ हजार ८६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे.
मुंबई -गेल्या ७८ दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. महामंडळाने आज १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ९२६ वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
३ हजार ८६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. तरी सुद्धा एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. महामंडळाने आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास काही दिसवानापासून सुरुवात झाली आहे. महामंडळाने आतापर्यत ३ हजार ८६४ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे.
सर्वाधिक मोठी कारवाई -
आज एसटी महामंडळाने गुरुवारी १८०, शुक्रवारी २२८ आणि आज १८५ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केली असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ९२६ वर पाेहचली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यभरातील २५० आगारांपैकी १८१ आगार सुरु झाले आहे. तर ६९ आगार संपामुळे अजूनही बंद आहेत.