मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे. तुटेपर्यंत ताणू नका, एसटी संपावर तोडगा काढा. चर्चेसाठी या. सुविधा मिळायला हव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावले आहे. तुटेपर्यंत ताणू नका, संपावर तोडगा काढा. चर्चेसाठी या. सुविधा मिळायला हव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
![ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण ST Worker Strike](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13713313-40-13713313-1637662518689.jpg)
दरम्यान, कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, असे केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळ आणि पोलिसांना असेल, असा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
एसटी चालक आणि वाहकांना कामावर रूजू होण्यापासून कोणीही अडवू नये. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्याची एसटी महामंडळाला, तर तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची पोलिसांना मुभा असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.