मुंबई : गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप चांगलाच चिघळला असून राज्यभरातील २५० डेपोमधून आज एकही बस बाहेर पडली नाही. एसटीच्या बसेस शंभर टक्के बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनावर एसटी महामंडळाकडून कालपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ९१८ एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
राज्यातील ९१८ कर्मचारी निलंबित
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्यामुळे कालपासून एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. काल एसटी महामंडळाकडून ३७६ तर आज ५४२ अशा एकूण ९१८ कर्मचाऱ्यांनावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या संपाचा आज १४ वा दिवस आहे. कामगारांचा संप आता चांगलाच चिघळला असून आज राज्यातील २५० आगार बंद होते. काल एसटी महामंडळाने केलेल्या कारवाईमुळे संपात सहभागी झालेले कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. बुधवारी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
आज ५४२ कर्मचारी निलंबित
आज एसटी महामंडळाकडून राज्यातील ६३ एसटी आगारातील ५४२ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये नागपूर विभागातील काटोल, रामटेक, गणेशपेठ, इमामवाडा, घाटरोड आगारातील ४६, वर्धा विभागातील तळेगाव आगारातील १०, भंडारा विभागातील पवणी, साकोली,भंडारा आगारातील ३०,चंद्रपूर विभागातील चिमुर,वरोरा आगारातील १५, अकोला विभागातील रीसोड, मंगळूरपीर आगारातील २०, बुलडाणा आगारातील चिखली, मेहकर, खामगाव आगारातील ३४, यवतमाळ विभागातील नेर, वणी, उमरखेड, पुसद आगारातील ४६, अमरावती विभागातील परतवाडा, चांदुररेल्वे, बडनेरा आगारातील २०, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद १, पैठण आगारातील १०, बीड विभागातील बीड, पाटोदा, धारूर, गेवराई आगारातील २२, उस्मानाबाद विभागातील भुम, तुळजापूर, कळंब, परांडा, उस्मानाबाद, उमरगा आगारातील ३६, परभणी विभागातील वसमत, जितुंर, कळमनुरी, परभणी, गंगाखेड आगारातील २५, नाशिक विभागातील नांदगाव, मालेगाव, पेठ, कळवण आगारातील ४०, महमदनगर विभागातील जामखेड, श्रीगोंदा, नेवासा आगारातील २०, जळगाव विभागातील जळगाव, एरंडोल, यावल आगारातील २८, पुणे विभागातील राजगुरुनगर, इंदापूर, नारायणगाव, विकाशा बारामती आगारातील २६, सांगली विभागातील इस्लामपूर, आटपाडी २८, सातारा विभागातील फलटण आगारातील २, सोलापूर विभागातील सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट ३५ आणि रायगड विभागातील कर्जत, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड १९ असे राज्यभरातील ५४२ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
ST Strike : लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणांवर निलंबनाची कारवाई - suspension of employee of st
ST Strike : ST चा संप चांगलाच चिघळला असून बुधवारी राज्यातील 250 डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून (MSRTC) 918 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लालपरी शंभर टक्के बंद; ९१८ जणावर निलंबनाची कारवाई