मुंबई -गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST workers strike) शंभर टक्के एसटीच्या बसेस बंद होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल २ हजार कामगार डेपोंमध्ये परतल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने कामगार कामावर परतू लागले आहे. आज (शुक्रवारी) १७ डेपोंमधून बस सोडण्यात आलेल्या आहे. या बसेसमधून ८०० पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच आज आझाद मैदान येथे सुरु असलेल्या संपात सुद्धा कामगारांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे दिसून आली आहे. त्यामुळे आज एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
२ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारालेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा संप करण्यास नकार दिला होता. तरी सुद्धा कर्मचाऱ्यांनी संपावर गेले आहे. यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून राज्यातील खासगी बस संघटनाना राज्यातील विविध स्टँडवरून खासगी बस गाड्या सोडण्याची परवानगी दिली आहे. याचबरोबर एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहे. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन २ हजार कर्मचारी आज कामावर रुजू केले आहे. त्यामुळे आज राज्यभरातील १७ डेपोंमधून एकूण ३६ बस सोडण्यात आलेल्या आहे. या बसेसमधून ८०० पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यभरात 36 गुन्हे दाखल
प्रवाशांचा सुविधेसाठी एसटी डेपोंमधून एसटी बसेस, खासगी ट्रॅव्हल्स आणि वडापच्या गाड्या सोडण्यात येत आहे. काही आंदोलकांनी राज्यभरात आठ ते दहा ठिकाणी एसटी आणि खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी कालपर्यंत राज्यभरात ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याशिवाय काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सध्या एसटी संपाआडून उपद्रव माजवणाऱ्या कामगारांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.
१२५ कोटी रुपयांचे नुकसान