मुंबई - सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा तोटा वाढला असून हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने ऐन दिवाळीचा तोंडावर एसटीच्या तिकिटात १७.१७ टक्यांची अधिक वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ आज (सोमवार) मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. दिवाळी सण हा जवळ आल्यामुळे सर्वत्र नागरिकांची जा-ये मोठ्या प्रमाणात असते, याच कालावधीत एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आता नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
- भाडेवाढीस संचालक मंडळाची मंजुरी -
गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे. आता त्यातच सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने एसटीच्या तिकिटात १७.१७ टक्यांची अधिक वाढ करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीनुसार शासनाला प्रवास भाडेदर ठरविण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रातील डिझेल, चासीज, टायर व महागाई भत्त्याच्या मुल्यात बदल झाल्याने त्यानुसार येणारे सुधारीत प्रवास भाडेदर लागू करण्यास एसटी महामंडळाचा संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.
- सोमवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ -
सुधारीत प्रवास भाडेदर सोमवारी मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी करण्याचा सूचना एसटी महामंडळातील सर्व विभागांना दिल्या आहेत. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, त्यांना वाहकाने त्या आरक्षण तिकिटाचा जूना तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक त्या तिकीट धारकाकडून वसूल करावयाचा आहे. याशिवाय १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी घेण्यात येणाऱ्या अर्ध्या आकाराची (Half Ticket) सवलत चालू राहिल. तसेच, पालकासोबत असणाऱ्या ५ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवासाची सवलत पूर्वीप्रमाणे चालू राहील.
- असे असणार नवीन दर -