महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Strike : एसटीचे कर्मचारी आमचेच, सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमुळे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राजकीय पद्धतीने उत्तरे दिली जात आसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

एसटीचे कर्मचारी आमचेच, सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील
एसटीचे कर्मचारी आमचेच, सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील

By

Published : Nov 12, 2021, 5:54 PM IST

मुंबई : एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छा आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमुळे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राजकीय पद्धतीने उत्तरे दिली जात आसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटलांकडून निषेध

या आधी सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने संघटनांकडून व्हायची. त्यामध्ये राजकीय पक्ष संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांचाही जयंत पाटील यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे.

नितेश राणेंची मागणी

दरम्यान, आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान नितेश राणे सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनात झाले तर मंत्र्यांची दुकाने बंद होतील. एसटीच्या विलीनीकरणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ, असेही नितेश राणे सांगितले.

हेही वाचा -ST Strike : सांगलीत आंदोलन थांबले; शिवशाही झाली सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details