महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Employee Strike: ५३ दिवसांनंतर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून केले बाहेर! - मुंबई आझाद मैदान एसटी कर्मचारी बाहेर

आझाद मैदानावर आंदोलन ( ST Employee Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सांयकाळ पाचनंतर मैदान सोडण्याच्या सूचना मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. या सुचनेचा मान ठेवत संपकरी कर्मचारी तब्बल 53 दिवसांनंतर आझाद मैदानावरून बाहेर पडले.

ST Employee left azad maidan
आझाद मैदान

By

Published : Jan 1, 2022, 7:32 PM IST

मुंबई -कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. मुंबई शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे, आझाद मैदानावर आंदोलन ( ST Employee Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सांयकाळ पाचनंतर मैदान सोडण्याच्या सूचना मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. या सुचनेचा मान ठेवत संपकरी कर्मचारी तब्बल 53 दिवसांनंतर आझाद मैदानावरून बाहेर पडले.

आझाद मैदान

हेही वाचा -Mega block on Central Railway : रविवारी 24 तासांचा मेगाब्लॉक; 'या' मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द!

उद्या होणार आंदोलन -

मुंबईच्या आझाद मैदानामध्ये राज्यभरातील आंदोलनकर्ते जमा होतात. या आंदोलनकर्त्यांना सकाळ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देण्यात आलेली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्यभरातून आणि खेड्यापाड्यातून कर्मचारी आले असल्याने रात्री त्यांना आझाद मैदानावरती राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोना, तसेच ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. रात्री जमावबंदीही लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार मुंबईतील आझाद मैदानमधील आंदोलनकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना मैदानातून सायंकाळ नंतर बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना दुसर्‍या दिवशी सकाळपासून पुन्हा आंदोलन करा, असे सांगण्यात आले आहे.

12 तास आझाद मैदान रिकामे असणार -

एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. याशिवाय गेल्या ५३ दिवसांपासून आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, ११ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. आता वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आझाद मैदानातील एसटी आनोदलकांना मुंबई पोलिसांनी निर्देश दिले आहेत. मुंबईत 144 कलम लागू आहे, संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे, आझाद मैदानातील आंदोलकांना पहाटे ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलनासाठी थांबता येणार आहे.

हेही वाचा -समिर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही पदमुक्ततेची सूचना नाही; 2 वर्षांत केली 'ही' कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details