मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वेळोवेळी वाढ केली असून त्यांना या महिन्यापासून २८ टक्के महागाई भत्ता लागू झाला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता द्या - एसटी कर्मचारी काँग्रेस!
एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी-
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेवर होत नाही. वेतन वेळेवर मिळत नसल्याने व कर्जबाजारी झाल्याने जवळपास २५कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दिवाळी सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून आजअखेर प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याचा फरक कर्मचारी व अधिकारी यांना अदा करावा तसेच या महिन्यापासून सदर महागाई भत्ता हा शासनाप्रमाणे २८ टक्के इतका देण्यात व दिवाळी सण ४ नोहेंबर पासून सुरू होत असल्याने ऑक्टोंबर महिन्याचे वेतन ७ नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबर रोजी करावे अशी मागणीही त्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना तात्काळ महागाई भत्ता द्या -
वाढत्या महागाईच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी पडत आहेत. त्यातच घराचे हप्ते, मुलाचा शिक्षणाचा खर्च, किराणा खर्च आदी विविध खर्च भागविणे कर्मचाऱ्याला खूप अवघड जात आहे. याशिवाय कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील ९६ हजार एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन नियमित होत नाही आहे. यामुळे सुद्धा एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सततच्या मानसिक दबावातूनच ते आत्म्हत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या वर्षांपासून एसटी महामंडळातील २५ कामगाराने आत्महत्या केली आहे. दिवाळी सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९ पासून आजअखेर प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याचा फरक कर्मचारी व अधिकारी यांना अदा करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.
हेही वाचा -ई टीव्ही भारत विशेष : वर्षभरात २५ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कारण काय?