महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Corporation Fires Employees : आणखी २२८ एसटी कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ; तर ३६७९ कामगारांना बजावल्या नोटीस ! - ST Corporation Fires Employees

बडतर्फीची कारवाई ( ST dismissed employees ) करूनही एसटीचे कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात ( State Transport corporation advertisement ) दिली आहे.

एसटी महामंडळ कारवाई
एसटी महामंडळ कारवाई

By

Published : Jan 7, 2022, 9:46 PM IST

मुंबई - गेल्या 77 दिवसांपासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी कामावर येत नाहीत. एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. महामंडळाने आज ( 7 जानेवारी ) 228 निलंबित कर्मचाऱ्यांना ( ST suspended 228 employees ) बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 714 वर पोहचली ( ST dismissed 1714 employees ) आहे.


3 हजार 679 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ दिली आहे. तर दुसरीकडे निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली ( State Transport corporation advertisement ) आहे.

हेही वाचा-World record performance : दृष्टीहीन सायकलपटूची जनजागृतीसह विश्वविक्रमी कामगिरी

एसटीचे एकूण 11 हजार 24 कर्मचारी निलंबित

एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाने आजतागायत 11 हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय 2 हजार 796 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी ( ST employees strike news update ) आहे. त्यामुळे निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास काही दिवसापासून सुरुवात झाली आहे. महामंडळाने आजपर्यंत 3 हजार 679 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाख‌वा नाेटीस बजावली आहे.

हेही वाचा-Kalicharan Maharaj Bail : अखेर कालीचरण महाराजांना जामीन मंजूर पण, 'या' प्रकरणात..


सर्वाधिक मोठी कारवाई -

एसटी महामंडळाने गुरुवारी 180 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, आज तब्बल 228 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केली असून आतापर्यतची सर्वाधिक मोठी कारवाई असल्याचे बोलण्यात येत आहे. आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 741 वर पाेहचली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यभरातील 250 आगारांपैकी 181 आगार सुरू झाले आहे. तर 69 आगार संपामुळे अजूनही बंद आहेत.

हेही वाचा-संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर.. जैश-ए-मोहम्मदकडून RSS मुख्यालय व परिसराची रेकी

ABOUT THE AUTHOR

...view details