मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी दिली. तसेच आता सीबीआय चौकशी आणि एम्सच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे आर्श्चय वाटते, असेही ते म्हणाले.
सुशांतचा खून झाला नसून त्याने आत्महत्या केली होती, असा निष्कर्ष डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने केलेल्या तपासणी अहवालात करण्यात आला आहे. आता सीबीआय चौकशीवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे, तसेच एम्सच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता केजीबी किंवा मोसादसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून किंवा हेग मधल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे करावी, असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला.