मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागानेच अव्वल येण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.३० टक्के तर त्याखालोखाल कोल्हापूर विभागाचा ९७.६४ आणि पुणे विभागाचा ९७.४३ टक्के निकाल लागला आहे. औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी ९२.०० टक्के निकाल लागलाय. मागील वर्षी दहावीचा निकाल ७७.१० टक्के होता. यंदा १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
#SscResult: प्रतीक्षा संपली...राज्यातील दहावीचा निकाल जाहीर! - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागीय मंडळातून १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हेाती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील १५ लाख १ हजार १०५ उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९५.३० टक्के लागला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हा विक्रमी निकाल आहे.
दहावीत २० विषयांचा निकाल १०० टक्के तर ५ लाख ३९ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. ५ लाख ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ३ लाख ३० हजार ५८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ८० हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे ८ हजार ३६० शाळांचा निकाला १०० टक्के लागला आहे.