मुंबई -विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावरील दहावी बारावीचा निकालावर परिणाम होईल, अशी शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 10 जूनपूर्वी दहावी ( SSC Exam Result ) आणि बारावीचा ( HSC Exam Result ) निकाल लावणार असल्याचा विश्वास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.
राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणार -सध्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च, 2022 रोजी सुरू होऊन 7 एप्रिल, 2022 रोजी संपली आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु होऊन 4 एप्रिल 2022 रोजी संपली आहे. आता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे पाठवण्यात आलेल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यासाठी उत्तर पत्रिका तपासणार नाही, असा बहिष्कार राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना टाकल्यानंतर दहावी-बारावीचा निकाल रखडणार असल्याचे सर्वत्र चर्चा होती. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, दोन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील. विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासण्याची भूमिका घेतली असली तरी, अनुदानित शाळांमध्ये राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणीचे काम पूर्ण केले जाणार आहे.