महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena Spokesperson Sunjay Raut : देशपातळीवर शिवसेनेचा खाडकन आवाज काढणारा प्रवक्ता शोधावा लागणार! - spokesman of Shiv Sena

शिवसेनेची ओळख कायम आक्रमकता रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला काही तासात बंद करण्याची ताकद असलेला पक्ष म्हणून ओळख आहे. संजय राऊत ( Shiv Sena Spokesperson Sunjay Raut ) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. मात्र, संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या भाषणाची शैली कायम ठेवत शिवसैनिकांच्या मनात भगवा वादळ ज्वलंत ठेवला.

Shiv Sena Spokesperson Sunjay Raut
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत

By

Published : Aug 3, 2022, 3:55 PM IST

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, दिवसागणित भाजपकडून सुरू असलेल्या नव्या आरोपांना सडेतोड उत्तर देणाऱ्या शिवसेनेचा बुलंद जेलमध्ये कैद झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाला शिवसेनेचे आक्रमक प्रवक्ते संजय राऊत ( Shiv Sena Spokesperson Sunjay Raut ) यांनी सतत अंगावर घेऊन शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडली. मात्र, राऊत जेलमध्ये गेल्याने शिवसेनेला परखड भूमिका मांडणारा प्रवक्ता शोधावा लागणार आहे.

'शिवसैनिकांच्या मनात भगवा वादळ ज्वलंत ठेवले' - शिवसेनेची ओळख कायम आक्रमकता रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला काही तासात बंद करण्याची ताकद असलेला पक्ष म्हणून ओळख आहे. संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. मात्र, संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या भाषणाची शैली कायम ठेवत शिवसैनिकांच्या मनात भगवा वादळ ज्वलंत ठेवला.

राऊत यांचा मोठा वाटा - पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊत केवळ साधारण प्रवक्ते नव्हते, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सेनेचा चेहरा म्हणून ओळख निर्माण केली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही राऊत यांचा मोठा वाटा आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात भाजपकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि सेनेच्या बहुतांश आमदारांवर कथित आरोप केले. खुद्द राऊतांवरही आरोपांचा भडीमार सातत्याने सुरू होता. मात्र या सर्व आरोपांना ठाकरी भाषेत संजय राऊत प्रतिउत्तर देत होते. भाजप नेते किरीट सोमैया यांचा घेतलेला खरपूस समाचार आजही चर्चेला जातो.

सेनेला ठाकरे शैलीच्या प्रवक्त्याची आवश्यकता : पक्षाची अधिकृत भूमिका, निर्णय, विचारधारा प्रवक्ते माध्यमांसमोर मांडतात कोणत्याही राजकीय प्रसंगी संबंधित पक्षाची दिलेली प्रतिक्रिया अधिकृत पक्षाची मानली जाते. राजकीय पक्षाची, नेतृत्वाची प्रतिमा जनतेसमोर तयार करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते. शिवसेनेसाठी हेच काम अनेक वर्षांपासून संजय राऊत करत आहेत. शिवसेनेचे १२ प्रवक्ते आहेत. प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका शितल म्हात्रे बंडखोर शिंदे गटात सामील झाल्या आहेत. आजवर संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर वगळता एकाही प्रवक्त्याने सेनेची आक्रमक भूमिका ठामपणे मांडताना दिसले नाहीत. खुद्द ठाकरे कुटुंबावर झालेल्या आरोपांना निर्भीडपणे तोंड देत, राऊत यांनी एकाकी खिंड लढवली. राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेची आक्रमक भूमिका खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि किशोरी पेडणेकर बाजू मांडत आहेत. मात्र सेनेच्या ठाकरी शैलीत विशेषतः संजय राऊत यांच्याप्रमाणे विरोधकांना प्रत्युत्तर देणारा प्रवक्ता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेमावा लागणार आहे.

संजय राऊत यांचे घनिष्ट संबंध - शिवसेनेत संजय राऊत यांच्यासारखा टोकाची भूमिका मांडणारा दुसरा कोणी नाही. राऊतांनी दिल्ली स्तरावरीही मोठा दबदबा निर्माण केला आहे. केंद्रातील सरकार संजय राऊत यांना वचकून होती. शिवसेनेचा आक्रमक चेहरा त्यांनी संसदेतही निर्माण केला होता. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस देशातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी संजय राऊत यांचे घनिष्ट संबंध आहेत. राऊत यांच्या अटकेमुळे आता ही पोकळी निर्माण होईल. राज्यासह देशपातळीवर शिवसेनेचे अस्तित्व परखडपणे मांडणारा नेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यावा लागेल. खासदार अरविंद सावंत जुने आणि अभ्यासू नेते आहेत. मात्र संजय राऊत यांच्यासारखी आक्रमक भाषण शैली सावंत यांच्याकडे दिसत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सावंत यांनी शिवसेनेत काम केले आहे. त्यांचा पिंड सेनेचा असल्याने देशपातळीवर ते आवाज बनू शकतील, असे मत राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे वर्तवतात. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाला अंगावर घेण्याचे काम आमदार भास्कर जाधव करू शकतात. तेवढा राजकीय अभ्यास, कायद्याची जाण त्यांच्याकडे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोघांच्या नावाचा विचार केल्यास महाराष्ट्रसह देशात शिवसेनेच्या आवाजाला बळ मिळेल, असे सुर्वे म्हणाले.

हेही वाचा -Supreme Court hearing : नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details