मुंबई - काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ ( video viral on basketball player ) प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक मुलगा व्हीलचेअर बसून बास्केटबॉल ( Wheelchair basketball game ) कसा खेळतात हे शिकत होता. या खेळात नवीनच असल्याने हा मुलगा काहीसा कन्फ्युज झाला होता. पण, त्याची आई त्याला पुढे ढकलत होती. या व्हिडिओला कॅप्शन होतं 'मा का प्यार' भावांनो हा मुलगा काही साधासुधा नाही. या मुलाचं नाव आहे श्रेयस बिरवाडकर आणि हा देशातील सर्वात लहान ( The youngest wheelchair basketball player in the country ) व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे.
लहानपणापासून दिव्यांग- श्रेयस बिरवाडकरने वयाच्या 10 व्या वर्षीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा देशातील सर्वात लहान व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या खेळाचा सराव करत आहे. श्रेयस लहानपणापासूनच दिव्यांग असला तरी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याच्यात लहानपणापासूनच आहे.
देशासाठी खेळाचे आहे -ईटीव्ही भारतशी बोलताना श्रेयस म्हणाला की, "सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी काही करू शकेल. पण, इथे येऊन मला आता भारी वाटतय. सहा महिने झालेत मी सरावाला सुरुवात केलेय. इथे आमच्याकडून व्यायाम करून घेतला जातोय त्यामुळे मला खूप तंदुरुस्त वाटते आहे. व्हीलचेअरवर बसून बास्केट बॉल कसा खेळतात हे मला इथे येऊन कळले. अनेक नवीन मित्र मला याच खेळामुळे मिळाले. या खेळात पारंगत होऊन मला देशासाठी खेळायचे आहे." अशी इच्छा श्रेयसने व्यक्त केली.
व्हिडीओमुळे लोक सेलिब्रिटी म्हणतात -त्याच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात श्रेयस म्हणाला की, "मी नवीनच असल्याने थोडासा कन्फ्युज झालो होतो. कोच सर काहीतरी सांगत होते आणि माझं तिकडे लक्ष नव्हतं. आई सारखी सांगत होती ती कडे लक्ष दे, तिकडे जा म्हणून. पण, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. मग आईनेच मला पुढे ढकलले. या सगळ्याचा व्हिडीओ माझी ताई शूट करत होती आणि तो गंमत म्हणून सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. सध्या या व्हिडिओला 8 मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिल असून या व्हिडिओमुळे मला लोकं सध्या सेलिब्रिटी सुद्धा बोलतात."
सुरुवातीला भिती होती -श्रेयसच्या या खेळा संदर्भात बोलताना त्याच्या मागे नेहमीच ढाल बनून उभी राहणारी मोठी बहिण रक्षंदा बिरवाडकर म्हणाल्या की, "सहाजिकच सुरुवातीला आम्हाला थोडी भीती होती की श्रेयस तर पुढे कसे होईल. त्यासाठी आम्ही इंटरनेटवर सतत काही ना काही शोधत बसायचो. मग आम्हाला इंटरनेटवर निषा गुप्ता भेटली. निषा गुप्ता या इंटरनॅशनलसाठी खेळल्या आहेत. त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलय, त्यादेखील व्हिलचेअर बास्केटबॉलपटू आहेत. मग, आमच्या थोड्या अशा पल्लवित झाल्या आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आमच्या श्रेयसला त्यांच्या टीम मध्ये सामावून घेतलं."