मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर... लता मंगेशकर यांची खरंतर ओळख करुन द्यायची गरज नाही. देश-विदेशातील तब्बल ३६ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत. त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. (Lata Mangeshkar passes away) तसेच, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न'ही त्यांना देण्यात आला आहे. (Latadidi's special songs) आज त्या आपल्यात नाहीत. (lata mangeshkar songs) त्यांचे आज (दि. 6 जानेवारी)रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. याच पार्श्वभूमीवर पाहूयात त्यांच्या काही खास गाण्यांबाबतचे खास किस्से...
लता मंगेशकर उर्फ लतादिदींचा जन्म १९२९ला झाला. पंडीत दीनानाथ मंगेशकर यांची सर्वात मोठी मुलगी म्हणजे लतादिदी. लतादिदींनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मदन मोहन, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन आणि ए. आर. रहमान अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे.
लतादिदींच्या कारकीर्दीतील एक अजरामर गाणे म्हणजे, 'लग जा गले'. १९६४च्या 'वो कौन थी' या चित्रपटातील हे गाणे कधीही जुने होऊ शकत नाही, असे लता स्वतःच म्हणाल्या होत्या.
लतादिदींची कारकीर्द ही मदन मोहन यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. मदन मोहन आणि लतादिदींच्या सर्वोत्कृष्ट दहा गाण्यांपैकी 'आपकी नजरोंने समझा...' हे गाणे नक्कीच नेहमी सर्वात वर राहील..
'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं ऐकल्यानंतर देशभक्तीचे स्फुरण चढत नाही असा व्यकी निराळाच! या गाण्यासाठी लतादिदी केवळ एकाच अटीवर मंजूरी दिली होती, ती म्हणजे रामचंद्र यांनी त्या गाण्याला सोलो ठेवावे. रामचंद्र यांनी ही मागणी मान्य केली, मात्र गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याला ड्युएट केले.