महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022 गणेशगल्लीत यंदा २२ फुटी विश्वकर्मा अवताराची मूर्ती, तर काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा - Ganesh Chaturthi 2022

गणेश गल्ली गणपतीची मुंबईचा राजा म्हणून ओळख आहे. यावर्षी या मंडळाचे हे 95 वे वर्ष आहे. गणेश गल्ली मंडळाने Ganesh Galli Ganpati festival यावर्षी विश्वकर्मा अवताराची मूर्ती उभारली जाणार आहे. त्यासह काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन मुंबईकरांना होणार Ganesh Chaturthi 2022 आहे.

Ganesh Galli Ganpati festival
मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपती

By

Published : Aug 23, 2022, 10:56 PM IST

Updated : Aug 25, 2022, 1:36 PM IST

मुंबई गणेशगल्ली येथील लालबाग ganesh galli lalbaug सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या वतीने यंदा २२ फुटांच्या पीओपीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. विश्वकर्मा अवताराची ही मूर्ती असेल. तसेच उत्तर प्रदेश येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची Shri Kashi Vishwanath Temple प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. यामुळे काशीला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन Shri Kashi Vishwanath Temple मुंबईतच घेता येणार आहे.

मंडळाचे हे ९५ वे वर्ष लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, गणेशगल्ली ganesh galli lalbaug हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ आहे. मंडळाची स्थापना सन १९२८ साली झाली. मंडळाचे हे ९५ वे वर्ष आहे. मंडळाची स्थापना पेरुची चाळ येथे झाली. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस होत असे. भजने, किर्तने, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असत. या उत्सवामागे व्यापारी वर्गाने गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे फार मोठे कार्य केले. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन येथे स्थलांतरित करण्यात आला. अंबाजी मास्तर व काही तडफदार उत्साही कार्यकर्त्यांनी १९३७ ३८ साली हा उत्सव गणेशगल्ली ganesh galli lalbaug परिसरात म्हणजेच आत्ता जेथे जागेचे देवस्थान आहे तेथे आणला. त्याच काळात हा श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली.

स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे१९४२ साली या उत्सव कार्याला फार महत्व प्राप्त झाले. या उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे श्रींच्या पुढे ठेवण्यात येऊ लागले आणि उत्सव हा लोक जागृतीचे केंद्रस्थान झाला. त्यावेळी प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळीचे भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस Subhas Chandra Bose श्री रुपाने स्वराज्याचा सुर्य सात घोडयांचा देखावा स्थापून लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी श्री चे विसर्जन करण्यात आले, याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा राजापूरकर मुर्तीकार ह्यांनी साकारला होता. सन १९४७ नंतर या उत्सवात स्वतंत्र भारत आणि विकास यांचे देखावे श्री पुढे सादर करण्यात Ganeshotsav 2022

आले.

२२ फुटांची विश्वकर्मा अवताराची मूर्तीलालबाग गणेश गल्ली ganesh galli lalbaug येथील गणेशोत्सव मंडळाची मुंबईचा राजा अशी ओळख आहे. गेले ४५ वर्षे मुंबईमधील सर्वात उंच गणेश मूर्ती हा मान आम्ही जपला आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे आम्हाला गणेश उत्सव साजरा करता आलेला नाही. मात्र यंदा पुन्हा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा २२ फुटांच्या पीओपीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. विश्वकर्मा अवताराची Vishwakarma ही मूर्ती असेल. तसेच उत्तर प्रदेश येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची Shri Kashi Vishwanath Temple प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. ज्या मुंबईकरांना येथे जाता येत नाही त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाने पीओपी मूर्ती वापरू नयेत असे म्हटले आहे. त्यासाठी आम्हाला पर्याय शोधावा लागणार असून आम्हाला त्यासाठी काही कालावधी लागणार आहे, असे गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी म्हटले आहे.

सामाजिक कामात अग्रेसर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पूरग्रस्त नागरिकांना मदत, अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत, कारगिल रिलीफ फंड, शैक्षणिक मदत, स्ट्रेचर व्हील चेअर वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आदी सामाजिक कामात मंडळ अग्रेसर आहे.

ई टीव्ही मराठीनेही केले होते मानांकित शिस्तबध्द सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणून ओळख असून तसा पुरस्कार काळाचौकी पोलीस ठाण्याकडून देण्यात आला आहे. काळाचौकी पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सव स्पर्धा २००७, २०१० मध्ये उत्कृष्ट देखावा, इंटरनेटचा राजा , बेस्ट सिक्युअर्ड गणेश मंडळ २००९, २०१०, २०११, ई टीव्ही मराठी etv marathi आयोजित उत्कृष्ट गणेश मंडळ आदी अनेक पुरस्कार या मंडळाला मिळाले आहेत.

हेही वाचा History and Culture of Lord Ganesh कोल्हापुरातले बिनखांबी गणेश मंदिर, शेंदूर काढल्याने मूळ मूर्ती उजेडात

Last Updated : Aug 25, 2022, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details