महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhosari land scam matter : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा जामीन अर्ज फेटाळला

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhri Bail) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. गिरीश चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (Girish Chaudhri bail Rejected) आहे.

Girish Chaudhri
गिरीश चौधरी

By

Published : Feb 18, 2022, 7:24 PM IST

मुंबई -राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhri Bail) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. गिरीश चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (Girish Chaudhri bail Rejected) आहे.

पुण्यातील भोसरी या ठिकाणच्या एमआयडीसीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे तसेच त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. या दोघांनाही मुंबई उच्च न्यायालयाचे संरक्षण प्राप्त आहे. मात्र, या प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून गिरीश चौधरी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु, उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details