मुंबई - कथित 100 कोटी वसुली प्रकरणात ( 100 Carod Money Laundering Case ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना अटक केली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात आज PMLA कोर्टाने ईडीला नोटीस बजावली असून या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात ( Special PMLA court issues notice to ED ) आली असून उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई सत्र PMLA न्यायालयाने दिले आहे.
जामीन अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी -
अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर गुरुवारी अनिल देशमुख यांनी PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण देशमुखांना जामीन मिळणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात गुरुवारी अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.