महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीची गोसावी याच्या जबाबाची याचिका न्यायालयाने फेटाळली

एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी युक्तिवाद केला की, केपी गोसावी या खटल्यातील स्वतंत्र पंच आहेत. आम्हाला आमच्या सीआर क्रूझ ड्रग्ज केसमध्ये आरोपपत्र दाखल करायचे आहे. म्हणून आम्ही कलम 67 एनडीपीएस कायद्यानुसार जवाब नोंदवायचा आहे. आमचे अधिकारी पुण्यातील जेलमध्ये जाऊन गोसावी यांचा जबाब नोंदवतील. याकरिता आम्हाला न्यायालयाने गोसावी यांचे जवाब रेकॉर्ड करण्याची परवानगी देण्यासाठी जेल प्रशासनाला देण्यात यावी, अशी मागणी केली.

केपी गोसावी
केपी गोसावी

By

Published : Nov 16, 2021, 11:14 AM IST

मुंबई- क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य पंच केपी गोसावी याचा जबाब नोंदवण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची याचिका विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावली. एनसीबीने पुणे न्यायालयात जाण्याचे NCB ला सांगितले आहे. एनसीबीने येरवडा मध्यवर्ती कारागृहात केपी गोसावी यांचे बयाण नोंदवण्याची परवानगी मागितली होती.

गोसावीने पुण्यातील 2018 मधील एका फसवणुकीच्या प्रकरणात नुकतेच पुणे पोलिसांसमोर सरेंडर केले होते. सध्या गोसावी पुणे पोलिसांच्या कस्टडीत आहे. गोसावी यांचा जबाब नोंदवण्यासाठी NCB ने पुणे न्यायालयाकडे अर्ज करावा. गोसावी सध्या पुणे न्यायालयाच्या ताब्यात असल्याने तांत्रिकदृष्ट्या एनसीबीने पुणे (NCB Pune) न्यायालयात जाणे आवश्यक होते, असे याचिकेवर निकाल देताना न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी म्हटले आहे.

एनसीबीचे वकील अद्वैत सेठना यांनी युक्तिवाद केला की, केपी गोसावी या खटल्यातील स्वतंत्र पंच आहेत. आम्हाला आमच्या सीआर क्रूझ ड्रग्ज केसमध्ये आरोपपत्र दाखल करायचे आहे. म्हणून आम्ही कलम 67 एनडीपीएस कायद्यानुसार जवाब नोंदवायचा आहे. आमचे अधिकारी पुण्यातील जेलमध्ये जाऊन गोसावी यांचा जबाब नोंदवतील. याकरिता आम्हाला न्यायालयाने गोसावी यांचे जवाब रेकॉर्ड करण्याची परवानगी देण्यासाठी जेल प्रशासनाला देण्यात यावी, अशी मागणी केली. या महिन्याच्या सुरुवातीला क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपींपैकी 15 जणांना जामीन मंजूर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details