महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut : संजय राऊतांसाठी घरातून आणला गेला खास जेवणाचा डब्बा; पहा काय आहे मेनू - Sanjay Raut

शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना न्यायालयीन कोठडीत असताना मुंबई सत्र न्यायालयाच्या ( Mumbai Sessions Court ) निर्देशनानुसार घरचे जेवण देण्यात येत आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Oct 10, 2022, 2:39 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना न्यायालयीन कोठडीत असताना मुंबई सत्र न्यायालयाच्या ( Mumbai Sessions Court ) निर्देशनानुसार घरचे जेवण देण्यात येत आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान दसऱ्यानंतरची पहिलीच सुनावणी असल्याने राऊत यांना घरून खास जेवण बनवून आणण्यात आले होते. सहकुटुंब संजय राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालयीन परिसरात उपस्थित आहे.


न्यायालय परिसरात शिवसैनिकांनी संजय राऊत यांना भेटण्यासाठी केली गर्दी: संजय राऊत यांना न्यायालयाने दिलेल्या निदर्शनानुसारच जेवण देण्यात येते. दसऱ्यानंतर राऊत पहिल्यांदाच न्यायालयीन परिसरात आल्याने सर्वच घरचे कुटुंब राऊत यांना दसऱ्यानिमित्त भेटण्यासाठी न्यायालय परिसरामध्ये जमले होते. त्यावेळी त्यांची पत्नी वर्षा राऊत, मोठी मुलगी तसेच जावई, भाऊ सुनील राऊत, लहान भाऊ आप्पासाहेब राऊत तसेच शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. न्यायालय परिसरात बाहेर आणि आत मध्ये अनेक शिवसैनिकांनी संजय राऊत यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.



काय आहे मेनू : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या करिता आज आलेल्या घरच्या जेवणाच्या डब्यामध्ये घरगुती जेवण होते. त्यामध्ये मिक्स व्हेज भाजी, पालक पनीर, डाळ तडका, राईस चपाती तसेच स्वीट मध्ये गुलाबजामून देखील आणण्यात आले होते. राऊत यांनी सहपरिवारांच्या समोर न्यायालयीन परिसरामध्ये जेवण केले होते. राऊत यांच्या जामीन अर्जावर दुपारी एक नंतर सुनावणी ठेवल्याने राऊत यांनी सुनवणीपूर्वीच जेवण पूर्ण करून घेतले होते.


ऑगस्ट महिन्यापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या वतीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. संजय राऊत यांच्यावतीने 27 सप्टेंबर रोजी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावतीने वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, ईडीकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे संजय राऊत यांच्या विरोधात नाही आहे. याप्रकारे अनेक आरोप देखील युक्तिवादा दरम्यान लावण्यात आले होते. या आरोपांवर तसेच राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीच्यावतीने आज युक्तिवाद करण्यात येणार आहे. त्याकरिता संजय राऊत न्यायालयीन परिसरामध्ये हजर झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details