मुंबई -आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे प्रकरण: वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री-गृहमंत्री यांच्यात बैठक
अॅड. कनिष्क जयंत यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की, आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली, अशा स्वरुपाचा लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचे जयंत यांनी सांगितले.
माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे, समीर वानखडेसह अन्य जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे खंडणीचेच रॅकेट