मुंबई -मुलांच्या बालपणावर आधारित (Movie based on childhood)चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री रीना जाधव यांच्या 'मेरिट अॅनिमल' या चित्रपटाला मुंबईत झालेल्या 10व्या भारतीय सिने चित्रपट महोत्सवात "स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन" पुरस्कार (Special Festival Mention Award for Merit Animal) मिळाला आहे. प्रतिष्ठित 10 व्या भारतीय सिने चित्रपट महोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि लघुपट दाखवण्यात आले. त्यात 'मेरिट अॅनिमल' या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याआधीही या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
बालपन दुर्लक्षित होता कामा नये -मेरिट अॅनिमल या चित्रपटाला 10व्या इंडियन सिने फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री रीना जाधव बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 'आपली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मुलांवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा भार टाकला आहे. आपल्याला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अव्वल व्हायचे असते, तसा प्रयत्न करा. परंतू यामुळे बालपन दुर्लक्षित होता कामा नये; असे रीना जाधव सांगितले. ही कथा आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करत नाही. तर ती मुलांच्या पालकांबद्दल बोलते; जे आपल्या मुलांवर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ओझे लादतात. गुणवत्तेच्या या शर्यतीत प्रत्येकजण अव्वल आहे. जगायचे आहे पण आपण दुर्लक्ष करतो ते बालपण. 'मेरिट अॅनिमल' हा चित्रपट आजच्या समाजासाठी डोळे उघडणारा आहे, असे रीना जाधव यांनी सांगितले.