मुंबई -भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी न्यायालयाने त्यांचा एक अर्ज मान्य केला आहे. (Elgar Parishad Case) आठवड्यातून दोन दिवस त्यांना कारागृहामध्ये लॅपटॉपवर केस संदर्भातील काम करता येईल, यासंदर्भातील न्यायालयाने जेल प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
आठवड्यातील सोमवार आणि बुधवारी लॅपटॉपचा वापर करू शकतात
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. (Bhima Koregaon accused Surendra Gadling ) त्यांना त्यांच्या केस संदर्भातील माहिती तसेच इतर केसेस संदर्भातील रेफरन्स पाहण्यासाठी लॅपटॉपचा तसेच इंटरनेट सुविधा देण्यात करिता न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. आठवड्यातील सोमवार आणि बुधवार या दोन दिवशी ते लॅपटॉपचा उपयोग करू शकतात असे NIA विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सुधा भारद्वाज आणि वरावरा राव यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला
सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. त्यांचा यापूर्वी विशेष न्यायालयात डिफॉल्ट जामीन तसेच रेगुलर जामीन विशेष न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात सुधा भारद्वाज आणि वरावरा राव यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. इतर आरोपींना अद्याप न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही.
फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी. वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.