महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष: रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे, 75 टक्के नागरिकांकडून शौचालयाचा वापर - mumbai breaking news

रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि कार्यवाही अभियान सुरु केले होते.

special-comfortable-railway-line-towards-hagandari-mukti
विशेष: रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे, 75 टक्के नागरिकांकडून शौचालयाचा वापर

By

Published : Mar 5, 2021, 8:15 PM IST

मुंबई -देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्‍या मुंबईतील रेल्वे मार्गांवरील रेल्वे रूळालगत शौचास बसत असल्याने रेल्वे प्रशासनाची गेल्या काही वर्षापासून डोके दुःखी वाढली होती. त्यामुळे रेल्वेने युद्धस्तरावर रेल्वे रूळावर जवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती, संरक्षण भीती आणि स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमामुळे रेल्वे मार्गावर प्रात:विधि करणाऱ्यांची संख्या 75 टक्यांनी कमी झाली. त्यामुळे रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करत आहे.

विशेष: रेल्वे मार्ग हागणदारी मुक्तीकडे, 75 टक्के नागरिकांकडून शौचालयाचा वापर

युद्धस्तरावर जनजागृती अभियान-

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, उपनगरीय रेल्वे मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य आणि रेल्वे रुळावर शौचास बसणाऱ्या नागरिकांमुळे रेल्वे स्थानकादरम्यान लोकल जात असताना प्रवासी नाकावर रूमाल ठेवून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत होते. यासंबंधी अनेक रेल्वे प्रवाशांनी तक्रारी सुध्दा रेल्वे प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि कार्यवाही अभियान सुरु केले होते. त्यांच्या परिणाम सुद्धा दिसून येत आहे.

प्रात:विधी करणार्‍या 1 हजार नागरिकांवर कारवाई-

लॉकडाऊन पूर्वी 2019 मध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेने रेल्वे रूळानजीक प्रात:विधी करणार्‍या 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाखांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. कोरोनामुळे ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती ईटीव्ही भारतला नाव न सांगण्याचा अटींवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

रेल्वेकडून प्रयत्न करणे गरजेचे-

सायन कोळीवाडा माजी वार्ड अध्यक्ष, एन. राज नायडू यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, पाच वर्षापूर्वी वडाळा रेल्वे स्थानकापासून ते जीटीबी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत झोपडपट्ट्या आहेत. मात्र स्वच्छालय नसल्यामुळे मोठ्या प्रमाणातील नागरिक रेल्वे रुळावर शौचास बसत होते. परिणामी मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गावर घाणीचे साम्राज्य होत होते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या काही वर्षांपासून यापरिसरात मोठ्या प्रमाणात शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या वडाळा ते जीटीबी परिसरात 37 शौचालय आहे. यामध्ये सर्वाधिक शौचालय रेल्वे रूळालगत आहे. यामुळे आज रेल्वे रुळाजवळ राहणारे 75 टक्के नागरिक मोठ्या प्रमाणात शौचालयाचा वापर करण्यात येतं आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळालगत होणाऱ्या बेकायदेशीर झोपडपट्टीवर लगाम लावणे गरजेचे आहे.

रेल्वेला सहकार्य करण्याचे आव्हान -

रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे रूळावर स्वच्छतेसाठी रेल्वे नेहमी प्रयत्नशील आहे. सरंक्षक भिंत बांधणे, रेल्वे रूळावर स्वच्छतेसाठी स्वच्छता गँगची नेमणूक करणे, वेळोवेळी स्वच्छता मोहीम हाती घेणे, बाग - बगीचे तयार करणे या सारख्या बाबीतून परिसर स्वच्छ ठेवला जातो. नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने प्रशासनाला स्वच्छता मोहिमेत सहकार्य करण्याचे आव्हान मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केला आहे.

स्थानकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात शौचालय-

स्वच्छ परिसर स्वच्छ रेल्वे स्टेशन याला केंद्र बिंदू मानून वेगवेगळ्या उपक्रम रेल्वेकडून राबविण्यात येत आहे. कोविड काळात आपण राबवत असलेल्या स्वच्छता मोहिमेत स्वच्छता रथ, स्वच्छता पखवाडा, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून रेल्वे परिसर आणि रेल्वे परिसर स्वच्छ कसा राहील याकडे आम्ही लक्ष देतोय आहे. सध्या मध्य आणि पश्चिमच्या उपनगरीय मार्गावर 141 शौचालय आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेवर 62, हार्बर 32, ट्रान्स हार्बर 10 आणि पश्चिम रेल्वे 37 शौचालय आहे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा-LIVE : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला

ABOUT THE AUTHOR

...view details