महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar विधानपरिषदेच्या गटनेतेपदी प्रविण दरेकरांची नियुक्ती - विधान परिषद गटनेते पदी

आज राज्य विधान परिषदेच्या Pravin Darekar Appointed MLC Group Leader गटनेतेपदी भाजपाचे नेते प्रवीण दरेकर BJP leader Pravin Darekar यांची नियुक्ती केल्याची Maharashtra Monsoon Session घोषणा सभापती नीलम गोऱ्हे Speaker Neelam Gorhe यांनी आज गुरुवारी केली. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांचे निकटवर्ती मानले जातात. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.

Pravin Darekar
Pravin Darekar

By

Published : Aug 25, 2022, 3:09 PM IST

मुंबई -राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा सरकार सत्तेवर आले. सध्या शिंदे सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपा शिंदे गट आणि महाविकास आघाडी असा वाद रंगला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आजराज्य विधान परिषदेच्या Pravin Darekar Appointment MLC Group Leader गटनेतेपदी भाजपाचे नेते प्रवीण दरेकर BJP leader Pravin Darekar यांची नियुक्ती केल्याची Maharashtra Monsoon Session घोषणा सभापती नीलम गोऱ्हे Speaker Neelam Gorhe यांनी आज गुरुवारी केली. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांचे निकटवर्ती मानले जातात. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.


विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारचे संख्याबळ अधिक आहे. विरोधकांपुढे सत्ताधारी पक्षाची बाजू ठामपणे मांडण्यासाठी भाजपाकडून माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या गटनेते पदी निवड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाची शिफारस पत्र सभापती नीलम गोऱ्हे यांना दिले. त्यानंतर सभापतींनी दरेकर यांच्या नावाची घोषणा केली.

हेही वाचा -Aditya Thackeray targeted युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details