मुंबई - गेल्या लॉकडाऊनमध्ये लागलेल्या ठेचेने टेलिव्हिजन मालिका निर्माते चांगलाच धडा शिकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला तेव्हा त्यांनी आपला ‘प्लॅन बी’ बाहेर काढला. देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले. परंतु सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच दाखल झालेली मालिका ‘तू सौभाग्यवती हो' च्या निर्मात्यांनी पुढील भागांच्या चित्रीकरणासाठी गाठले आहे गोवा.
सोनी मराठीची ‘सौभाग्यवती’ पोहोचली गोव्याला! - Saubhagyavati serial shooting
देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले.
एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'तू सौभाग्यवती हो' थोड्याच काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. साधी, भोळी तरीही हुशार, सालस अशी गावातली मुलगी ऐश्वर्या आणि त्याच गावतले मोठे प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं, पण सिनेसृष्टीत 'शो मस्ट गो ऑन' असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे सोनी मराठीच्या मालिकांचे मनोरंजन अखंडित सुरू राहणार आहे. 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आताही बघायला मिळताहेत. मनवा नाईकच्या स्ट्रॉबेरी प्रॉडक्शन या संस्थेची निर्मिती असलेली मालिका 'तू सौभाग्यवती हो'चा चमू आता गोव्याला पोचला असून मालिकेच्या पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होईल. कदाचित महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपल्यावरही काही काळ ते गोव्यातच एपिसोड्सचे शूटिंग करणार आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठीच ही सर्व धडपड सुरु आहे. 'तू सौभाग्यवती हो' ही मालिका प्रसारित होते सोम.-शनि., संध्या. ७ वा. सोनी मराठीवर.