मुंबई -काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्यावर कर चुकवल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सोनू सुद याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आपली बाजू मांडलीच पाहिजे, असं नाही. कधी कधी वेळही उत्तर देते, असे त्याने म्हटले आहे.
काय म्हणाला सोनू सुद -
मी प्रामाणिकपणे देशसेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या संस्थ्येचा प्रत्येक रुपया मी गरजुंसाठी खर्च होतो. तसेच बऱ्याच वेळा मी अनेक वेळ ब्रॅंडला मदत करण्यासाठी विनंती देखील करतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मी काही कामात व्यस्त होतो. मात्र, आता मी तुमच्या सेवेत परत आलो, असे त्याने म्हटले आहे.
हेही वाचा- मुंबई : गीतकार जावेद अख्तर मानहाणी प्रकरणी कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर