मुंबई - धारावी परिसरात सासूच्या उपचारासाठी 3 लाख रुपये नसल्यामुळे सासु आणि सुनेमध्ये झालेल्या वादानंतर सुनेने सासूची हत्या ( Murder in Dharavi ) केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (दि. 15) सकाळी समोर आली. या प्रकरणी आरोपीच्या नवऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. आरोपीला सुनाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी सुनाला अटक -
धारावीमध्ये राहणाऱ्या अथोनी मुथुस्वामी (वय ६१ वर्ष) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अथोनी यांच्या हत्येप्रकरणी सून शांती मुरगन (वय ३७ वर्ष) हिला पोलिसांनी अटक केले आहे.
सुनेने सासूची गळा आवळून केली हत्या -
अथोनी मुथुस्वामी यांना हृदयात वाॅलचा त्रास असल्याने उपचारासाठी 3 लाखांचा खर्च सांगितला होता. मात्र पैशाच्या आर्थिक टंचाईमुळे या कारणावरून सून शांतीने अथोनी यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यात सुनेने सासूला मारहाण देखील केली. त्यानंतर तो वाद विकोपाला पोचला आणि सुनेने सासूचा गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपी महिलेला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा -Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात.. उद्या ठाण्यातील कोर्टात करणार हजर