महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut : संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप, ट्विट करत म्हणाले, ५ हजार ६०० कोटींच्या..

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर आज पुन्हा गंभीर आरोप ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) केले. ५ हजार ६०० कोटींच्या एनएसइएल घोटाळ्यात ( 5600 Cr NSEL Scam ) ईडीने चौकशी केलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून ( Motilal Oswal Company ) सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ( Yuvak Pratishtan Donations ) लाखो रुपयांचे डोनेशन मिळाल्याचा आरोप राऊत यांनी केला.

sanjay raut
संजय राऊत

By

Published : May 11, 2022, 10:20 AM IST

मुंबई :सलग तिसऱ्या दिवशी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) आहेत. ५ हजार ६०० कोटींच्या एनएसइएल घोटाळ्यात ( 5600 Cr NSEL Scam ) ईडीने चौकशी केलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून ( Motilal Oswal Company ) सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ( Yuvak Pratishtan Donations ) लाखो रुपयांचे डोनेशन मिळाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, कालच राऊत यांनी पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणात ( Metro Dairy Case West Bengal ) ईडी आणि सीबीआयने धाडी टाकून ( ED CBI Raid ) चौकशी केलेल्या कंपनीकडून भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संस्थेला ( Yuvak Pratishthan ) देणगी देण्यात आल्याचा आरोप केला होता. आप क्रोनॉलॉजी समझिये, हिसाब तो देना पडेगा, म्हणत राऊतांनी ट्विट केले ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) होते.

आज पुन्हा नवीन आरोप :राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्यांकडून नेते, मंत्र्यांवर विविध आरोपांचा भडीमार सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील सोमय्यांनी कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. राऊत यांनी ही सोमय्यांवर आरोप करत प्रत्युत्तर देत आहेत. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सोमय्या पिता - पुत्रांनी जमवलेल्या निधीत अफरातफर केली, असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणानंतर गुन्हा दाखल झाल्याने सोमय्या नॉट रीचेबल झाले. मात्र न्यायालयाने सोमय्यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटच्या माध्यमातून सोमय्यावर नवीन आरोप केले आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut : ईडी, सीबीआयने धाडी टाकलेल्या कंपनीकडून किरीट सोमय्यांच्या संस्थेला देणगी, राऊतांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details