मुंबई - ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या घोटाळ्यांचे आरोपांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी साडेबारा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुश्रीफ यांनी याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी तब्बल 2700 पानांचे पुरावे ईडीला सादर केल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांनी याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मुश्रीफ आणि सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील ११ नेत्यांचे घोटाळे उघड केले आहेत. आता मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे तीन आरोप केले आहेत. या संदर्भात सोमय्या आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.