महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis : घोटाळे बाजांवर कारवाई झालीच पाहिजे; किरीट सोमय्या यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें ( Chief Minister Eknath Shinde ) सोबत नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मेट्रोची वाट लावली होती. फक्त कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे पाहिजेत म्हणून काम बंद केले होते असा आरोप त्यांनी केला. कारशेडच्या नावाने बंदी पडलेल्या प्रकल्पाला पुनर्जीवित करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी केले आहे.

Action must be taken against scammers; Kirit Somaiya
घोटाळे बाजांवर कारवाई झालीच पाहिजे; किरीट सोमय्या

By

Published : Jul 1, 2022, 10:54 PM IST

Updated : Jul 1, 2022, 11:07 PM IST

मुंबई -भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Kirit Somaiya met Fadnavis ) यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सुरू असलेल्या कारवायांबाबत चर्चा केली. भ्रष्ट्रचारी नेत्यांवर कारवाया झाल्या पाहिजेत, अशी विनंती त्यांनी फडवणीस यांना केली. ते भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची वाट लावली?याप्रसंगी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें ( Chief Minister Eknath Shinde ) सोबत नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मेट्रोची वाट लावली होती. फक्त कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे पाहिजेत म्हणून काम बंद केले होते असा आरोप त्यांनी केला. कारशेडच्या नावाने बंदी पडलेल्या प्रकल्पाला पुनर्जीवित करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी केले आहे. हा अतिशय महत्त्वाचा पहिला निर्णय घेतल्याचे सोमय्या म्हणाले.

घोटळेबाजांवर कारवाई होणारच?स्टेटमेंट देऊन, नौटंकी करून, स्टंटबाजी करून जी माफीगिरी केली आहे, ती लपवता येणार नाही, असे सोमय्या यांनी सांगितले. मग ते संजय राऊत असो किंवा अनिल परब त्यांच्यावर कारवाई होणारच असेही सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांना ईडीने पाचव्यांदा समन्स पाठवले आहे. संजय राऊतच्या बाबत सिद्ध झाले आहे. त्यांची १४ कोटींची प्रॉपर्टी जप्त झाली आहे, म्हणून ईडी तपासाला सहकार्य करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. चोरी, लबाडी केली असेल तर कारवाई तर होणारच. मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या घोटाळे बाजांवर ज्या कारवाया सुरू आहेत त्या अंतिम निर्णयापर्यंत गेल्या पाहिजेत.

हेही वाचा -Heavy Rain In Mumbai : मुंबईत पावसामुळे दाणादाण; पुढील २४ तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता

Last Updated : Jul 1, 2022, 11:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details