महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Police Constable Suicide : कर्जबाजारीपणामुळे सोलापुरातील पोलीस हवालदाराची मुंबईत आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे कांजूरमार्ग परिसरात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Police Constable Suicide In Mumbai ) आहे. गौतम साबळे, असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

गौतम साबळे
गौतम साबळे

By

Published : May 28, 2022, 10:12 PM IST

Updated : May 28, 2022, 10:39 PM IST

मुंबई -कर्जबाजारीपणामुळे कांजूरमार्ग परिसरात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतम साबळे, असे या पोलीस हवलदाराचे नाव आहे. गौतम साबळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली ( Police Constable Suicide In Mumbai ) आहे.

गौतम साबळे हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर येथील इमारत क्र. पी 1 येथे वास्तव्याला होते. साबळे यांनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे बँकांच्या कर्जाचे हफ्ते फेडू शकत नसल्याने ते नैराश्येत होते. याच विवंचनेतून शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. साबळे यांच्या कुटुंबीयांना सोलापूरमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, साबळेंनी इतके कर्ज का घेतले होते?, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत

हेही वाचा -Love Jihad case in Haryana : पतीकडून 'लव्ह जिहाद' झाल्याचा 12 वर्षानंतर पत्नीचा आरोप

Last Updated : May 28, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details