मुंबई- शिखर बँकप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 'ईडी'ने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अनेक शहरांमध्ये निदर्शने केली. तर, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत अजित पवार कधी 'ईडी' कार्यालयात जाणार म्हणत त्यांना चिमटा काढला आहे.
'शरद पवार 27 स्पटेंबरला ईडी कार्यालयात जाणार पण...अजित पवारांचं काय?' - ईडी
शिखर बँकप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 'ईडी'ने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
अंजली दमानिया
हेही वाचा -ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट
शुक्रवार (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, स्वतः २७ सप्टेंबरला ईडी कार्यालयात जाणार...हे जरी चांगले असले ..पण मग अजित पवारांचं काय? ते कधी जाणार? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.