मुंबई- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, म्हणजेच जेएनपीटी बंदरावर सुमारे अकरा कोटींच्या विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. विशेष म्हणजे, चक्क खजुराच्या कंटेनरमध्ये लपवून या सिगारेटींची तस्करी करण्यात येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार; दुबईहून जेएनपीटी, न्हावा शेवा बंदरावर आलेल्या एका जहाजामधील खजूराच्या कंटेनरमधून या सिगारेटी जप्त करण्यात आल्या आहेत. कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यानंतर विदेशी ब्रँडच्या तब्बल ७१ लाख ६१ हजार ६०० सिगारेट आढळून आल्या. यांची एकूण किंमत सुमारे अकरा कोटी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.