महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासा! झोपडपट्टी पुनर्वसन इमारतींना सात दिवसात काम सुरू करण्याची परवानगी - buildings in mumbai

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना त्यातही पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

mumbai building reconstructions
दिलासा! झोपडपट्टी पुनर्वसन इमारतींना सात दिवसात काम सुरू करण्याची परवानगी

By

Published : Aug 14, 2020, 3:33 PM IST

मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना त्यातही पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.आता एलओआय-आयओए मिळालेल्या एसआरए प्रकल्पातील पुनर्वसन इमारतीच्या कामांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आता केवळ सात दिवसांत सीसी (कमेंस सर्टिफिकेट) अर्थात प्रत्यक्ष काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासंबंधीचे एक परिपत्रक अखेर जारी करण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय एसआरए प्रकल्पातील रहिवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

मुंबईत मोठ्या संख्येने एसआरए प्रकल्प सुरू आहेत. त्यात नवीन प्रकल्प सुरू करताना बिल्डरांना अनेक प्रकारच्या परवानग्या घ्यावा लागतात. एलओआय-आयओएपासून सीसी मिळवण्यासाठी कित्येक महिने घालवावे लागतात. परिणामी काम सुरू करण्यास विलंब होतो आणि रहिवाशांना हक्काचे घर मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. ही बाब लक्षात घेता पुनर्वसन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी झोपू प्राधिकरणाने सीसी केवळ सात दिवसांत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

एलओआय-आयओए मिळण्यासाठी सहा-आठ महिने लागतात. या परवानग्या मिळाल्यानंतर प्राधिकरणाकडून सीसी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू करता येते. पण सीसी मिळवण्यासाठी चार ते सहा महिने लागतात. त्यामुळे काम सुरू करण्यासही सहा महिन्यांचा विलंब होतो. तेव्हा हा विलंब टाळत पुनर्वसन इमारतीचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आता सीसी केवळ सात दिवसांत देण्यात येणार आहे. दरम्यान केवळ पुनर्वसन इमारतींसाठीच बिल्डरांना सात दिवसांत परवानगी मिळणार आहे. विक्रीसाठी इमारतीच्या बांधकामासाठी ही सवलत लागू नसेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details