मुंबई -पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्थानकांवर प्रवाशांसाठी 80 स्लिपिंग पॉट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा आणि रेल्वेला महसूल मिळणार आहे. या 80 स्लिपिंग पॉटपैकी 32 पॉट हे सीएसएमटी स्थानकांवर आणि उर्वरित 48 एलटीटी रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येणार आहे.
खासगी कंपनीशी करार
रेल्वे गाड्या अनेकदा उशिरा धावत असतात, त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर रेल्वेची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. याकरता रेल्वे प्रवाशांना आरामाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्लिपिंग पॉटची संकल्पना मध्ये रेल्वेकडून राबवण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेकडून निविदा काढण्यात आल्या होत्या. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एका खासगी कंपनीशी या संदर्भात 5 वर्षांचा करार करण्यात आला आहे. यातून मध्य रेल्वेल्या वर्षाकाठी 2 कोटी 50 लाखांपर्यंत महसूल मिळेल असा आंदाज रेल्वे प्रशासनाने वर्तवला आहे.
मुंबईत रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येणार स्लिपिंग पॉट रेल्वे प्रवाशांना मिळणार या सुविधा
रेल्वे प्रवाशांना स्लीपिंग पॉटबरोबर रेल्वे स्थानकावर वायफाय, वातानुकूलित कक्ष, की कार्ड सुविधा, वाचण्यासाठी वृत्त पत्रे, पुस्तके, चांगले स्वच्छतागृह, या सारख्या सुविधा देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना स्लिपिंग पॉटची सुविधा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या याचे शुल्क ठरविण्यात आलेले नाही. मात्र स्लिपिंग पॉट बसून झाल्यावर यांचे दर ठरविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.
महसूल वाढिसाठी रेल्वेचा प्रयत्न
रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी, न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम (एनआयएनएफआरआयएस) सुरू केली आहे. या मार्फत महसूल वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेच्या झोनल स्तरावर अनेक योजना राबिविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी स्लिपिंग पॉट सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा -Exclusive कोरोनाचा धसका : कोल्हापूर-बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सीमा केल्या बंद