मुंबई- चेंबूर ते टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पुलाखालील स्लॅब रेल्वेच्या विद्युत वायरवर पडल्याची घटना घडली. त्यामुळे हार्बर लोकल सेवा ठप्प झाली आहे.
हार्बर मार्गावर लोकलच्या विद्युत वायरवर कोसळला पुलाचा स्लॅब - टिळक नगर
या घटनेमुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे. तर हार्बर मार्गावरची दोन्ही बाजूची लोकल सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पुलाखालील स्लॅब रेल्वेच्या विद्युत वायरवर पडल्याची घटना घडली आहे.
प्रवासी पायी चालत जवळचे स्थानक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली आहे. तर हार्बर मार्गावरची दोन्ही बाजूची लोकल सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे.
Last Updated : Aug 3, 2019, 5:23 PM IST