मुंबई - टीआरपी घोटाळ्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. अंधेरी उपगनरामधून उमेश मिश्राला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे टीआरपी घोटाळ्यातील आरोपींची संख्या सहा झाली आहे.
टीआरपी घोटाळा: सहाव्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक - मुंबई पोलीस न्यूज
टीआरपी घोटाळ्यातील आरोपींची संख्या एकूण झाली आहे. जाहिरातींचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही वाहिन्यांकडून टीआरपी वाढविण्यासाठी घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप आहे.

टीआरपीची आकडेवारी गोळा करण्यासाठी मीटर लावलेल्या घरांमध्ये ठरावीक वाहिन्या पाहण्यासाठी उमेश मिश्राने लोकांना लाच दिल्याचा आरोप आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या हंस संशोधक गटाने मुंबईल पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर टीआरपीचा घोटाळा समोर आला आहे. जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी काही वाहिन्या टीआरपीच्या संख्येत छेडछाड करत असल्याचा दावाही हंस संशोधक गटाने केला आहे.
टीआरपी घोटाळ्यात बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी ही वाहिन्यांचा समावेश असल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गेल्या आठवड्यात केला होता. टीआरपी वाढवून जाहिरातींचे उत्पन्न मिळविणे हा प्रसारण वाहिन्यांचा उद्देश होता, असे मुंबई पोलीस आयुक्तांनी म्हटले होते.