Mucormycosis : केईएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसमुळे सात रुग्णांचा एक डोळा काढला
मुंबईत सुमारे 700 म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. एकट्या केईएम रुग्णालयात 130 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान 80 टक्के रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. म्युकर मायकोसिसमुळे केईएम रुग्णालयात 6-7 रुग्णांचा एक डोळा काढण्यात आल्याचे डॉ. मिलिंद नारकर यांनी सांगितले आहे.
मुंबई - मुंबईच्या केईएम रुग्णालयात म्युकरमायकोसिसमुळे 6-7 रुग्णांचा एक डोळा काढण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली. दुसरी लाट आटोक्यात आली असली तिसऱ्या लाटेची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटात आणखी एक संकट समोर उभे आहे. हे संकट म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुपाने उभे आहे. हा आजार इतका घातक आहे की, वेळीच उपचार केले नसल्यास रुग्णचा जीव जाण्याची शक्यता असते. तर अनेक प्रकरणात रुग्णांचे डोळे देखील काढावे लागतात.
- 1. मधूमेह आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना म्युकर मोयकोसिसचा धोका
2 स्टेरॉयडचे जास्त सेवन करणाऱ्यांना
3. ICUमध्ये जास्त काळ राहणाऱ्या रुग्णांना
4. वोरिकोनाजोल थेरेपी घेणाऱ्यांना
म्युकरमायकोसिसची लक्षणे - - 1. सायनसचा त्रास जानवणं, नाक बंद होणं, नाकाच्या हाडात दुखणं
2 नाकातून काळ्या रंगाचा द्रव पदार्थ अथवा रक्त येणं
3. डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं
4. अंग दुखणे
5. श्वास घेण्यास त्रास होणे
6. ताप येणे