मुंबई- एखाद्या चित्रपटात इमारत किंवा पूल पडतो, त्यामधून लोकांना रस्सीच्या आणि शिड्या लावून बाहेर काढले जाते असाच चित्रपटात दिसणार सिन मुंबईत घडला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अहमद इमारत आज सकाळी कोसळली. या इमारतीमधून सहा जणांना अशाच फिल्मी स्टाईलने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्यात आला आहे.
दुर्घटनाग्रस्त अहमद इमारतीमधून 6 जणांना सुखरूप काढले बाहेर
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील लोहार चाळ जवळ तळ अधिक चार मजली अहमद इमारत आहे. आज सकाळी 10.42 वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये 6 जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली. इमारतीमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले त्यामध्ये एक महिला आणि पाच पुरुष आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील लोहार चाळ जवळ तळ अधिक चार मजली अहमद इमारत आहे. ही इमारत म्हाडाची सेझ इमारत आहे. आज सकाळी 10.42 वाजताच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये 6 जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली.
अहमद इमारतीमध्ये दोन कुटूंब राहत होती. तसेच एक गोडाऊन भाड्याने देण्यात आले होते. इमारत कोसळली त्यावेळी हे दोन कुटुंबीय वरच्या मजल्यावर अडकले होते. एक इमारत सोडून बाजूला असलेल्या इमारातीमधील गोडाऊनच्या दरवाजामधून अहमद इमारतीमध्ये रस्सी आणि शिड्या लावून या कुटुंबामधील लोकांना बाहेर काढण्यात आले. इमारतीमधून सहा जणांना बाहेर काढण्यात आले त्यामध्ये एक महिला आणि पाच पुरुष आहेत. त्यामधील दोन जण बाहेरील होते असे अर्जुन टावरे यांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल, मुंबई महापालिका अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.
TAGGED:
दुर्घटनाग्रस्त अहमद इमारत