महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चार महिन्याभरात ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील - किरीट सोमैय्या

वाझे वसुली प्रकरणी सरकारमधील सहा मंत्री येत्या चार महिन्यात सीबीआयच्या दारात उभे असतील, असा खळबळजनक दावा माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

kirit somaiyya press conference
महिन्याभरात ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील - किरीट सोमैय्या

By

Published : Apr 29, 2021, 8:03 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या भयभीत झाले असून वाझे वसुली प्रकरणी सरकारमधील सहा मंत्री येत्या चार महिन्यात सीबीआयच्या दारात उभे असतील, असा खळबळजनक दावा माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सोमैय्या यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

सहा मंत्री सीबीआयच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत -

ठाकरे सरकार हे अत्यंत भयभीत झाले असून त्यांच्या सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी परमवीर सिंग, रश्मी शुक्ला आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर दबाव आणण्याचे काम हे ठाकरे सरकार करत असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केली.

ठाकरे सरकारने योग्य प्रकारे लसीकरण करून दाखवावे -

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याने कोरोनाग्रस्तांचा मृत्यू वाढला आहे. ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. रुग्णालयात 50% ऑक्सिजन आणि 25 टक्के रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने 12 एप्रिलनंतर कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील खाजगी रुग्णालय 50 टक्केच रुग्ण घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात केंद्र सरकारने लसी आयात करण्यास परवानगी दिली असून उद्धव ठाकरे सरकारने आता 1 मेपासून योग्य प्रकारे लसीकरण करून दाखवावे. कोरोना लसीकरणाबाबत ऊठसूट केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या राज्य सरकारमधील नेत्यांवर आता लसीकरणाची जबाबदारी आहे, ती त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडून दाखवावी, असे आवाहनही सोमैय्या यांनी केले.

हेही वाचा - कोविड लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; सर्व अधिकारी राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details