मुंबई - मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलचा जामीन मंजूर झाल्यानंतर आता इतर सात जणांचा जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS न्यायालयाने या सात जणांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यन खाननंतर आता इतर 7 जणांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीचे आयोजक संचालक गोपाल आनंद यांच्यासह नुपूर सतेजा, गोमीन चोप्रा, अचित कुमार, गोपाळजी आनंद, भास्कर अरोरा, मानव सिंघल आणि समीर सेहगल अशा एकूण सात जणांना मुंबई सत्र न्यायालयाने (NDPS) जामीन मंजूर केला आहे.
एनसीबीने क्रूझवर जेव्हा छापेमारी केली तेव्हा आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह नंतर या सातही जणांना अटक केली होती. मात्र सातही जणांच्या जामीन अर्जावर आज विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्ती वैभव पाटील यांनी जामीन मंजूर केला आहे. आता जामीनाची ऑर्डर प्रत आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच यांचीही सुटका होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचे देखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.
क्रुझवर एनसीबीने जप्त केले होते ड्रग्स -
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, पार्टीतून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या होत्या त्याचबरोबर १ लाख ३३ हजार रुपये रोख सुद्धा क्रूझवर एनसीबीने जप्त केले होते.
हेही वाचा -Aryan Khan Released : अखेर 26 दिवसांनंंतर आर्यन खान ऑर्थररोड तुरुंगातून बाहेर