मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगाला वेठीस धरले आहे. महाराष्ट्रात दररोज 8 हजारांच्या वर बाधित रुग्णांची संख्या समोर येत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. तर, लक्षणे नसलेल्या रुग्णांना विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड केंद्रांमध्ये ठेवण्यात येते. अलिकडेच कोविड केंद्रांमधील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल आणि कोल्हापूर येथे महिला रुग्णांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, हे दावे कसे पोकळ आहेत, याची पोलखोल करणारा हा वृत्तांत!
कोणाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, की रुग्णाची खरी परीक्षाच सुरू होते. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये नेण्यात येते. ही सेंटर वरवरुन चांगली वाटतात. परंतु, प्रत्यक्षात अनुभूती वेगळीच येते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मार्गदर्शक तत्वांनुसार काही मुलभूत सुविधा आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण, या ठिकाणी त्याचाच अभाव असतो. रुग्णांकडून वारंवार तक्रारी करण्यात येतात. तरीही अनेकदा प्रशासनाकडून हवी तशी गंभीर दखल घेतली जात नाही. कोविड सेंटरची जबाबदारी कंत्राटदारांवर देण्यात येते. त्यांच्याकडून वेळच्या वेळी नाष्टा, जेवण, इत्यादींचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात यापैकी काहीही होत नाही. एवढेच काय तर अंघोळीसाठी गरम पाण्याचीही सोय नसते. थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. गरम पाण्याची उपकरणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र अनेक कोविड सेंटरमध्ये दिसून येते. कोविड सेंटरच्या अशा कारभाराविरोधात रुग्णांना आंदोलने करावी लागली. त्यानंतर काही प्रमाणात चित्र सुधारले.
देहुरोडच्या सेंटरमध्ये सुविधांचा अभाव
पिंपरी-चिंचवड शहरा लगत असलेल्या देहूरोड परिसरात 140 कोरोना बाधित रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण हे देहूरोड कंटनमेंट बोर्डाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नसून सेंटर ची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णांनी देखील विविध सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला आहे. देहूरोड परिसरात 100 खाटांचे कोविड सेंटर असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्था नाही, दारे तुटलेली, पाण्याचे गिझर बंद (गरम पाणी नाही) कचऱ्याचे ढीग आहेत. काही रुग्णांनी दोन ते तीन दिवस झाले अंघोळ केली नाही. दारे तुटलेली असल्याने थंड वाऱ्याने कोरोना रुग्ण त्रस्त आहेत. देहूरोड ला रुग्णाची संख्या वाढली आहे. सेंटरमध्ये आत्तापर्यंत 150 रुग्ण उपचारासाठी दाखल केले होते, त्यापैकी 60 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर सध्या 37 रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. बाकीच्या रूग्णांना त्यांच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. देहूरोड कंटेंमेंट बोर्डाच्या अधीक्षक सुनीता जोशी यांनी काही आरोप फेटाळून लावत दार, आणि इतर सुविधा नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
वसईत रुग्णांनी केले आंदोलन
वसई पूर्वे वरून इंडस्ट्री येथे पालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, व सफाई कामगारांची वानवा होती. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. अनेकदा सूचना करूनही रुग्णालय प्रशासन दखल घेत नसल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी महापालिकेत आंदोलनेही केली.
कल्याणमध्ये शिक्षिकेने केली पोलखोल