मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम ( Sonu Nigam bollywood singer ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सोनू निगमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सोनू निगम नवरात्रीमध्ये मांस बंदीवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सोनू निगम म्हणतोय की, मी हा काही भक्त नाही, की मी जय श्री राम म्हणावे. पुढे बोलताना सोनू निगमने नवरात्रीत मांसबंदी का असावी यावरही तो बोलवो. एक माणूस मटण विकत आहे. तो त्याचे काम करत आहे. मग त्याचे दुकान बंद का करावे? त्याचा व्यवसाय का बंद करावा, असे तो म्हणाले.
सोनू निगम यांच्यावर नकारात्मक चर्चा -सोनू निगमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याचा विरोध कमेंट करत आहेत. नवरात्रीत मांसाहारावर बंदी नसल्याच्या मुद्द्यावरून काही जण त्यांना घेरताना दिसत आहेत, तर काहींनी जय श्री रामच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, यातील काही लोकांनी सोनू निगमच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे.